सोलापूर – जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हा निवड चाचणी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी हरीभाई देवकरण प्रशालेत भरवण्यात आली होती या निवड चाचणीत प्रशालेच्या 11 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
या खेळाडूंची दिनांक 5 ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या जी टी पी कॉलेज नंदुरबार येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे
दिव्या माळगे,सृष्टी वाघमारे, बिना घोडके,कार्तिकी मोरे, श्रुतिका मोरे, राशी गायकवाड,वैष्णवी जेऊर्गी, सानिका व्यवहारे,अक्षरा कांबळे, समृद्धी शेटे,सुशीला गुमळे या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक गुरुसिद्ध होर्तीकर ,प्रचिता जोगदांडे यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय शिक्षण समितीचे चेअरमन सन्माननीय धर्मराज काडादी साहेब प्रशालेचे पालक सदस्य प्रभुराज मैंदर्गीकर सर्व शालेय शिक्षण समितीचे सदस्य मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनिता वाले यांनी अभिनंदन केले


























