सोलापूर – द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) आयोजित महाराष्ट्र राज्य मुली (ज्युनिअर)संघ निवड चाचणी कुपरेज ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये लिट्ल फ्लावर काॅन्वेट हायस्कूलची कु. कादंबरी संतोष पाटील हिची डॉ. तेलिमेरन एओ ज्युनिअर मुली राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप २०२५-२६ (Tier 2)
मुलींची राष्ट्रीय स्पर्धा दि. १८ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२५-२६ या कालावधीत धिमपूर ,नागालॅड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. कादंबरी हि अत्यंत हुशार, कष्टाळू,मेहनती मुलगी आहे तिची खेळाबद्दलची भावना, विश्वास आणि प्रेम या सर्व गोष्टींच्या जोरावर आज ती दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे तसेच आई वडील आणि भाऊ यांचेदेखील या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे.
तिच्या या निवडीबद्दल सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर सर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी प्रा.डाॅ. किरण चौगुले सर, किरण(पप्पू) दुस्तकर सर यांनी कौतुक केले.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापिका सिस्टर सिलीन कराकट यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूला प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रसेनजीत सुर्यवंशी सर यांचेदेखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.


















