बार्शी – क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्यावतीने राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या सान्वी गोरे हिने घवघवीत यश संपादन केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये १४ वयोगट मुलींमध्ये राज्यातून तृतीय क्रमांक मिळवत राज्याच्या यादीत येण्याचा मान मिळवला.
या खेळासाठी संघ व्यवस्थापक म्हणून अतुल नलगे यांनी काम पाहिले. सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक पुष्कराज पाटील, योगेश उपळकर व विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल सान्वी गोरेचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ मिराताई यादव व एस.बी. शेळवणे, सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के.डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन.बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



















