सांगोला – तालुका भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी सिद्धेश्वर गाडे यांची निवड करण्यात आली आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी तालुका पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक कामात योगदान दिले आहे. त्यांनी भाजपचे कार्यालयीन प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत पक्षाचे दैनंदिन कामकाज, कार्यकर्त्यांशी समन्वय तसेच विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीपणे पार पाडत आहेत.
या निवडी प्रसंगी सिद्धेश्वर गाडे म्हणाले, यापुढे तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटन अधिक मजबूत करणार आहे.
नव्या कार्यकर्त्यांना जोडणे, युवकांना संधी देणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे यावर भर राहील. सदर निवड झाल्याबद्दल सिद्धेश्वर गाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























