सांगोला – दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सवासाठी सांगोला महाविद्यालयाच्या श्रुती घाडगे, अकीब तांबोळी, रितेश धनवडे या विद्यार्थ्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघामध्ये निवड झाली आहे.
या निवडीचे पत्र विद्यापीठ प्रशासना कडून नुकतेच महाविद्यालयास मिळाले आहे. जे.एस.एस.अँकडमी ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च, म्हैसूर येथे दि.९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान हा दक्षिण पश्चिम विभागीय युवा महोत्सव होत आहे.
संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.रामचंद्र पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे यांच्यासह सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सदर निवडीबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























