बार्शी – महाराष्ट्र शासनामार्फत आयोजित शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा २०२५-२६ मधील पुणे विभागीय विज्ञान ऑलंपियाड स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा पानगाव क्र. एक च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कल्पना चंद्रसेन उकिरडे यांनी पुणे विभागात द्वितीय क्रमांक पटकवला.
कल्पना उकिरडे- देशमुख यांची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभागातून निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल बार्शीच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले यांनी सन्मान करुन राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याबद्दल गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके, विस्तार अधिकारी भारत बावकर, धनाजी जाधवर, सरपंच जयसिंगराव देशमुख, शाळा समिती अध्यक्ष बालाजी पवार, केंद्रप्रमुख सुधीर कुलकर्णी, मुख्यध्यापिका मिनाक्षी पवार, सर्व शिक्षक वृंद, पालक यांनी अभिनंदन केले व राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


















