अकलूज – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत के.टी.एच.एम.कॉलेज नाशिक या महाविद्यालयात केंद्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा महोत्सवामध्ये अकलूज अभ्यास केंद्राच्या तीन विद्यार्थ्यांची अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अकलूज अभ्यास केंद्रातील एकूण तेरा विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठ अंतर्गत पुणे विभागीय केंद्राच्या वतीने शिरूर जिल्हा पुणे येथे विभागीय स्तरावरील क्रीडा महोत्सवामध्ये विविध स्पर्धात सहभाग घेतला होता.या क्रीडा स्पर्धेतून पुणे विभागीय केंद्रामार्फत अकलूजच्या सहा विद्यार्थ्यांनी केंद्रीय क्रीडा महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला.यामध्ये रेहान रियाज तांबोळी उंच उडी,आर्यन मंगलसिंग साळुंखे बास्केटबॉल व महेश महादेव जाधव भालाफेक या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी झाल्याने यांची अश्वमेध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते -पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सभापती सयाजीराजे मोहिते- पाटील,सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे,केंद्रप्रमुख प्रा.डॉ.शिवप्रसाद टिळेकर,केंद्र संयोजक डाॅ.बाळासाहेब मुळीक व अभ्यास केंद्रातील सर्व समंत्रक यांनी अभिनंदन केले व पुढील अश्वमेध स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


















