Friday, March 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्व. सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ३४६ रक्तदात्यांचे रक्तदान

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in social
0
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याही वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराची तयारी गेल्या एक महिन्यापासून सुरु होती. या रक्तदान शिबिरामध्ये ग्रामीण भागातील व शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व व्यापारी तसेच विद्यार्थी, महिला व इतर सर्व स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ३४६ रक्तदात्यांनी रक्तदान करुन श्रद्धांजली वाहिली.

या रक्तदान शिबिरात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते सहभागी होतात. रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादामुळे रक्तदान शिबीर रात्री उशिरापर्यंत सुरु होते. यामध्ये २३ महिलांनी तसेच एकत्रित १० जोडप्यांनी, ७ डॉक्टरांनी, बार्शी शहर व ग्रामीणमधील ४ पोलीस बांधवांनी, बार्शी वकील संघातील ९ वकील बांधवांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जय शिवराय प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्यावतीने परिश्रम घेतले जात होते. या रक्तदान शिबिरास प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील भेटी दिल्या. यामध्ये मा आमदार राजेंद्र राऊत, डॉ. संजय अंधारे, डॉ. राहुल मांजरे, डॉ. कांबळे, नगरसेवक दीपक राऊत, नगरसेवक अनिरुद्ध वाणी, नगरसेवक रोहित पाटील, नगरसेविका सारा मुल्ला, छत्रपती ग्रुप, विजेता जिम सेंटर, मावळा ग्रुप, मेडिकल असोसिएशन सदस्य यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. त्याचबरोबर डॉ.बी.वाय. यादव, मा. गटनेते नगरसेवक श्री विजयनाना राऊत,

 नगराध्यक्ष सौ. तेजस्विनी कथले, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, मा. नगरसेवक प्रशांत कथले, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, शिवसेना नेते विजय माने, डॉ. सुनिल फटाले, डॉ. सचिन करळे, नगरसेवक संतोष बारंगुळे, नगरसेवक भारत पवार, नगरसेवक संदेश काकडे, नगरसेवक मदन गव्हाणे, भैरव शिंदे, स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, तुळशीदास मस्के या मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या निवडीबद्दल संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला व नगराध्यक्षांनी सत्काराच्याप्रसंगी हार, बुके, फुले, शाल न देता शालेय साहित्य देण्याची भावना व्यक्त केली होती. ही गोष्ट लक्षात घेऊन १२० विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शालेय साहित्य देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा देखील अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिष्ठित व्यापारी,पत्रकार बांधव व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.या रक्तदान शिबिरासाठी परिश्रम किरण राऊत, राजेश राऊत, राजन ठक्कर, अनिल जैंद, सचिन ललवाणी, सुनिल ललवाणी, सुधीर राऊत, रावसाहेब यादव, कार्याध्यक्ष राहुल वडेकर, उपाध्यक्ष सुहास गुंड, सचिव विनीत नागोडे, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील, मराठा समन्वयक ॲड. गणेश हांडे, मार्गदर्शक किरण कोकाटे, 

विजय राऊत, अमोल वाणी, विनायक हांडे, सचिन राऊत, ॲड आकाश तावडे, संकेत वाणी, बाबासाहेब बारकुल, सुस्मित बागल, श्रीकांत राऊत,अनिल शेलार, कृष्णा परबत, विनायक घोडके, सागर क्षीरसागर, राहुल घोडके, अमित नागोडे, विकास पौळ, अविनाश वैदय, माधव जाधव, गणेश वाणी, डॉ. राहुल शेळके, सुरज वाणी, यश कदम, गणेश पन्हाळकर, वैभव विधाते, कृष्णा शिंदे, सागर माने, अक्षय अंबुरे, सतीश राऊत, सागर माने, मनोज मोरे, नागराज सातव, दीप उपळकर, राहुल जाधव,ओम सुरसवे त्याच बरोबर भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे, गणेश जगदाळे, अशपाक काझी या सर्वांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते.

Post Views: 537
Previous Post

मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर नागरी प्रश्न सोडवण्यासाठी एकच झपाटा सुरु

Next Post

मध्य रेल्वेने २०२५ मध्ये ३४.७१ कोटींची नोंदविली मालवाहतूक वाढ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मध्य रेल्वेने २०२५ मध्ये ३४.७१ कोटींची नोंदविली मालवाहतूक वाढ

ताज्या बातम्या

‘इको फ्रेंडली क्लब’चा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!

‘इको फ्रेंडली क्लब’चा 12 व्या वर्षीही इको फ्रेंडली रंगांचा जागर!

March 6, 2026

जबरदस्तीने धर्मांतर केल्यास सात वर्षांची कैद. #public #solapurnews #marathinews

March 6, 2026

ज्येष्ठ नागरिक महिलांना रेल्वे प्रवास मिळणार का ..? #public #marathinews #viral #breakingnews

March 6, 2026

निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू.. #public #marathinews #solapurnews #viral

March 6, 2026

रंजिता चाकोते निवडीवर आज शिक्कामोर्तब. #solapurnews #brekingnews #public #viral #aajsolapur

March 6, 2026

आता सोलापुरात शासकीय महाविद्यालय जूनपासून.#public #marathinews #viral #breakingnews #news

March 6, 2026

विहिरीत पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. #children #marathinews #solapurnews #karamala

March 6, 2026

हिंदू शब्दाचा अर्थ सोयीनुसार लावू नका. #public #viral #marathinews #maharashtranews #aajsolapur

March 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0717447

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697