वाळूज – मागील तीस वर्षाच्या काळात मोहोळ विधानसभा मतदार संघातील प्रश्नावर विधानसभेत लोकप्रतिनिधिचा आवाज कधी घुमला नाही. तो मी अनगर नगरपंचायत, रस्ते, पाणी, पूर परस्थिती, नुकसान भरपाई, कायदा सुव्यवस्था यासह विविध प्रश्नावर आवाज उठविला.तुम्ही जनतेनी मला दिलेलं मतदान वाया जाऊ देणार नाही यांची खात्री देतो.नरखेडसह परिसरातील तीस ते चाळीस गावाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सीना -भोगावती जोडकालव्याच्या योजनेला लवकरच मंजुरी मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मात्र या योजनेला मंजुरी नाही मिळाली तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे प्रतिपादन मोहोळचे आ राजू खरे यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे भाजपचे कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या प्रयत्नातुन नरखेड व परिसरातील विविध गावांसाठी मंजूर झालेल्या भोगावती नदीवरील पूल, जि प केंद्र शाळा इमारत, अप्रोच रस्ते यासह 30 कोटी 92 लाख रुपयांच्या विविध विकासकामाचा भूमीपूजन सोहळा व जाहीर सभा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे व्हिडीओ कॉन्फसद्वारे ऑनलाईन उपस्थित होते.त्यावेळी आ खरे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ.राजू खरे, जि प चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, भाजपचे कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील,राहुल क्षीरसागर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उज्वला थिटे, विजय कोकाटे, अजिंक्य क्षीरसागर, ,श्रीकांत गायकवाड, संजय विभुते,सुरेश चव्हाण,चंद्रकांत निकम,संभाजी कोकाटे,भीमराव वसेकर, सुनील पाटील, प्रज्ञा बनसोडे, यशस्वी भोसले, सुनीता सोनार, गौरी शिंदे,महेश धुमाळ,दीपक पुजारी, विद्या कोळकुर,पांडुरंग साठे उपस्थित होते.
यावेळी बोलताना बळीराम साठे म्हणाले कि,नरखेड परिसराने आजतगायत विकासापासून वंचित राहिला आहे. मात्र सध्या आ राजू खरे, उमेश पाटील, संतोष पाटील ही त्रिमूर्ती तुमच्या सेवेसाठी उपलब्ध झालेली आहेत. नरखेड व भागाला विकासकामे करणारी माणसं पाठीशी असल्याने भविष्यात या परिसरातील कोणतीच विकासकामे शिल्लक राहणार नाहीत असा विश्वास शेवटी साठे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास नरखेड जि प गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.तर प्रस्ताविक ज्ञानेश्वर गोटणे यांनी केले.आभार सरपंच बाळासाहेब मोटे यांनी मानले.
Byte-
नरखेड भागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध
माजी राज्यमंत्री कै शहाजीराव पाटील यांच्यानंतर नरखेड भागावर विकासाच्या बाबतीत राजन पाटील यांनी सातत्याने अन्याय करून विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. या भागातील त्यांच्याच जि प, पं स व इतर पदाधिकाऱ्यांना स्वतःहून कुठली कामे करण्याची मुभा नव्हती. या भागातील मागील तीस ते चाळीस वर्षाच्या
विकासाचा अनुशेष शिल्लक तो भरून काढण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगून नरखेड भागातील नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही. सीना -भोगावती जोड कालवा करणार या आश्वासनावर आजपर्यत मते घेतली मात्र सीना-भोगावती जोडकालव्याच्या कामाचा एखादा कागद तरी कुठे दिला नाही. या भागातील जनता आता तुमच्या भूलथापाना आम्ही बळी पडणार नसून
अनगरकरांची गुलामगिरी घालविण्यासाठीच मी आलो असून त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे सांगत आगामी जि प निवडणुकीत नरखेड गटातून उभा राहणार आहे.
– संतोष पाटील, भाजप कार्यकारिणी सदस्य
byte-
निधी आणण्यामध्ये संतोष पाटील माझ्यापेक्षाही पुढचे वस्ताद
राजन पाटील यांची मागील 50 वर्षापासून मोहोळ तालुक्यावर असलेली सत्ता पालटवली.त्यामध्ये सर्वाधिक जास्त मत्ताधिक नरखेड गटाने दिले आहे. आमचे प्रश्न सोडवायला आम्ही खंबीर असल्याचे सांगत तालुक्याचा विकास करयचा असता तर मलिकपेठ येथील सीना नदीवरील पुलाचा प्रश्न रखडत ठेवला नसता. राज्याच्या तिजोरीची चावी अजित पवार यांच्याकडे आहे. आमदार विरोधी पक्षाचे आहेत.पूर परिस्थितीमध्ये देखील पाहणी करण्याचे औदार्य दाखविले नसून मी स्वतः
कुरुल जि प गटात निवडणूकीला उभारण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी तेथील पदाधिकाऱ्यांनी तुमच्या सारख्या व्यक्तीची गरज असल्याचे सांगितले. अनगरकरांचा पराभव फक्त नरखेडकरच करू शकतात त्यासाठी राम लक्ष्मणाची जोडी तयार असल्याचे सांगत सत्तेचा गैरवापर करण्यासाठी अनगरकराना सत्ता पाहिजे का?.तुम्ही जनतेनी ताकद दिली तर तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यात आपलं वैभव उभा करू असे सांगून माजी आ यशवंत मानेना आम्ही लीड दिला तरीही आमच्यावर अन्याय केला त्यामुळे त्यांना पाडावे लागल्याचे सांगत विकासकामे करायला आम्ही तत्पर आहोत मात्र तालुक्याचा कारभार पाहायला आम्हाला संधी देण्याचे आवाहन करत माझ्या पेक्षाही जास्त निधी आणायला संतोष पाटील वस्ताद आहेत.
-उमेश पाटील,जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस.
या गावांना मिळणार निधी
नरखेड, डिकसळ, मसले चौधरी, देगाव, वाळूज, भैरववाडी- मनगोळी , मलिकपेठ, शिरापूर (सो.), हिंगणी (नी.), मोरवंची, बोपले, भोयरे, खुनेश्वर, दाईंगडेवाडी या गावातील रस्त्यांना निधी मंजूर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

























