Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदाशिव  देवधर यांची तरुण भारत परिवाराकडून सदिच्छा भेट

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ मागदर्शक सदाशिव उर्फ सदुभाऊ देवधर  यांची सोलापूर तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांनी शुक्रवारी (ता.२८) येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षाच्या कारकिर्दीवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान या शंभर वर्षाच्या कार्यकाळातील काही जुन्या आठवणींना श्री.देवधर यांच्याकडून यावेळी उजाळा देखील देण्यात आला. 

यावेळी श्री.देवधर यांनी राष्ट्रीय स्वयंसवेक संघातील आपल्या सुरुवातीच्या काळा पासून ज्या ज्या ठिकाणी सेवाकार्य करण्याची संधी त्या त्या भागाची आणि त्या त्या काळात ज्या ज्या महान व्यक्तींचा त्यांना सहवास मिळाला त्या बद्दलची सविस्तर माहिती यावेळी सांगितली. श्री.देवधर यांची अत्यंत साधी राहणी, केलेल्या कामा बद्दलचा कोणताही अहंमभाव नाही. या बरोबरच संघाबद्दलची त्यांची निष्ठा, आत्मियता, प्रेम तसेच या वयात देखील त्यांची असलेली तल्लखबुध्दी आणि त्यांच्याकडे असलेला सखोल माहिती कथन केली.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ मार्गदर्शक सदुभाऊ देवधर हे वृध्दापकाळाने आता पंढरपूर येथील निवासस्थानीच वास्तव्यास असतात. वृध्दापकाळ आणि तब्येतीच्या कारणामुळे पहिल्या सारखे झोकून देवून कार्य आता त्यांच्या हातून होत नाही. मात्र संघा बद्दल असलेली तळमळ आज देखील त्यांना निवांत बसु देत नाही. संघाच्या रोजच्या घडामोडीची माहिती आज देखील श्री.देवधर हे नियमितपणे घेत असतात. संपुर्ण हिंदस्थानभरातून वास्तव्यास असलेले भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसंघाचे अनेक जुने,जाणते पदाधिकारी तसेच विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकर्ते श्री.देवधर यांची भेट घेण्यासाठी आवर्जुन पंढरपूर येथे त्यांच्या निवासस्थानी येत असतात. या भेटी दरम्यान त्यांच्याकडून मागदर्शनासह काही जुनी माहिती देखील आवर्जुन जाणून घेत असतात. मध्यंतरीच्या काळात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील श्री.देवधर यांना दिल्ली येथे खास निमंत्रण पाठवुन बोलावून घेऊन आवर्जुन त्यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान पंतप्रधानांनी श्री.देवधर यांच्या तब्येतीची विचारपूस करुन त्यांच्या बरोबर विविध विषयावर चर्चा देखील केलेली होती. 

दरम्यान अशा या महान व्यक्तीच्या भेटीमुळे आपण धन्य झाल्याची भावना यावेळी तरुणभारतचे संपादक प्रशांत माने यांनी श्री.देवधर यांचे चरणस्पर्श करुन दर्शन घेत व्यक्त केली. यावेळी संपादक श्री.माने यांनी श्री. देवधर यांना सोलापूर येथील दैनिक तरुण भारतच्या नवीन प्रिटिंगप्रेस आणि नव्या वास्तुतील कार्यालयास आवर्जुन भेट देण्याचे निमंत्रण देखील दिले.

श्री.देवधर यांच्या या सदिच्छा भेटीवेळी संपादक श्री.माने यांच्यासोबत सोलापूर तरुणभारतचे विपणन विभागाचे मुख्य प्रबंधक मनोहर बायनी, वितरण विभागाचे प्रमुख श्री.शिवशरण, पंढरपूर विभागाचे प्रतिनिधी महेश भंडारकवठेकर तसेच पंढरपूर येथील तरुणभारत वृत्तपत्राचे एजंट संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते.

———————— 

राष्ट्रयज्ञ के शंभर वर्षे या विशेषांकाचे देवधर यांच्या कडून कौतूक –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपली शंभर वर्षाची वाटचाल पुढच्या वर्षी पुर्ण करीत आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शंभर वर्षाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या दैनिक सोलापूर तरुण भारत कडून नुकताच प्रसिध्द करण्यात आलेल्या राष्ट्रयज्ञ के शंभर वर्षे हा विशेषांक श्री.देवधर यांना भेट देण्यात आला. यावेळी श्री.देवधर यांनी या विशेषांकांची कुतुहलाने पाहणी करुन या विशेषांकाच्या निर्मिती बद्दल सोलापूर तरुण भारत व्यवस्थापनास धन्यवाद दिले. 

Post Views: 32
Previous Post

मोडनिंब येथील रक्तदान शिबिरात ८० जणांचे रक्तदान

Next Post

युनिफॉर्म फेअरला परराज्यातील बाराशे तर परदेशातील पंधरा गारमेंट व्यापाऱ्यांची सदिच्छा भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युनिफॉर्म फेअरला परराज्यातील बाराशे तर परदेशातील पंधरा गारमेंट व्यापाऱ्यांची सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील मोठी कारवाई १२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त #public #marathinews #solapurnews

February 18, 2026

बदनापूर तालुक्यात संजय गांधी योजनेत मोठा गैरप्रकार.?? #public #marathinews #viral

February 18, 2026

विकास कामात कसलीही तडजोड नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल : आ.बबनराव लोणीकर

February 18, 2026

श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे व प्रथमोपचार पेटी.

February 18, 2026

संत सेवालाल महाराजांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ : आमदार बबनराव लोणीकर.#public #marathinews

February 18, 2026

प्रभात इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

February 18, 2026

न्यू हायस्कूल परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची रहिवाशांची मागणी..#public #solapurnews

February 18, 2026

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686220

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697