भोकर / नांदेड – एके काळचा दुष्काळतग्रस्त मराठवाडा पुरग्रस्त झालाय जलवाहु परिवर्तन हव तस झाले नाही शासनाचे अधिकारी तात्काळ अमलबजावणी करीत नाहित म्हणून शेतकर्याना हाल अपेष्टा भोगाव्या लगतात असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रनेत्या ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केल्या पाटकर ह्या दि. २४डिसेंबर २५ रोजी पुरग्रस्त धानोरा ता.भोकर गावास भेट देऊन तेथील शेतकरी नागरीकांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत.
यावर्षी जुलै,आँगस्ट२०२५मध्ये ढगफुटी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व माती खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले शेतातील विहिरी बुजून गेल्या घराघरात पाणी शिरले होते शासनातर्फे तुटपुंजी मदत मिळाली तर कांही लोकांना मदतच मिळाली नाही ही माहिती मिळाल्यानंतर मेधा पाटकर ह्या किनवट येथील साने गुरुजी रुग्णालय इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपून बुधवार दि.२४ डिसेंबर सायंकाळी भोकरला आल्या येथील संजीवनी हॉस्पिटलला भेट दिली असता डाँ.रामेश्वर भाले, डाँ.सौ.मनिषा भाले यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी सेवासमर्पणचे दिगंबर देशमूख, बालाजी तुमवाड, प्रा.उतम जाधव,पत्रकार विठ्ठल फुलारी आदी उपस्थित होते.
त्यानंतर सायंकाळी धानोरा गावात जावून शेतकरी व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या नागरिकांनी त्यांच्यासमोर यावर्षी आँगस्ट मध्ये पडलेल्या ढगफुटी पावसांने कसे नुकसान झाले गावात अल्पभूधारक शेतकरी, मोलमजूरदार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे प्रतिनिधी गावाला एकवेळ भेट दिली परंतु भरीव मदत दिली नसल्याचे तेथील सरपंच सौ. वंदना करपे आणि इतर नागरिकांनी सांगितले. तेव्हा मेधा पाटकर म्हणाल्या तुम्ही शेतकरी, नागरिक संघटित झाले पाहिजे जलसंपदा मंत्रालय, कृषी विभाग झोपलेल्या अवस्थेत आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. कृषी निती,जल वाहिणीचे परिवर्तन जागोजागी पाणी अडविणे नाला रूदी व सरळीकरण होत नाहीत असे अनेक शेतकरी हिताचे प्रश्न पाटकर यांनी उपस्थित केल्या. तलावातील गाळ अनेक वर्षापासून न काढल्यामुळे पाणी उथळ होऊन शेतात व घरात शिरून नागरिकांचे बेहाल होतात असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले.
यावेळी मेधाताई म्हणाल्या गावातील शेतकरी,नागरिकांनी शासनाचा अन्याय सहन न करता सर्वानी संघटित होवून शासन दरबारीं आंदोलन छेडले पाहिजे!त्या शिवाय सरकार जागे होत नाही. तुम्ही संबधित विभाग जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन द्या तुमच्या पाठीशी मी आहे.असा दिलासा ग्रामस्थाना मेधा पाटकर यांनी दिला. सूत्रसंचालन ज्येष्ठ कार्यकर्ते नागोराव शेंडगे बापू यांनी केले.
यावेळी जेष्ठ पत्रकार एल. ए. हिरे, डाँ. बालाजी कोंपलवार,राजेश करपे, श्रीनिवास लांमगे, सुभाष मुळेकर, सुभाष खांडरे,प्रल्हाद हमद, सिताराम करपे उपस्थित होते.

























