मुंबई – “यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” याची प्रचिती शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके या तरुणीने समाजाला दिली आहे.
मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाताची निवड भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (इस्रो)शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत तिने मिळविलेले हे यशाबद्दल सर्वस्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुजाता यांनी आपल्या शिक्षणात सातत्य राखत, आयुष्यभर कष्ट आणि चिकाटीचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अविरत मेहनतीच्या जोरावर तिने आपले इप्सित साध्य केले.
“स्वप्न मोठं असावं, मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा, यश नक्कीच मिळतं,” हे सुजाता मडके यांच्या यशकथेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
तिच्या यशाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह संपूर्ण परिवहन विभागाने सुजाता हिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सुजाता मडके आपल्या आई -वडिलांसोबत.




















