सोलापूर – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा बार्शी यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यंदा कवी माधव पवार यांच्या ‘गरुडभरारी’ या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. अशी माहिती अध्यक्ष पांडुरंग निपाणीकर यांनी दिली आहे.
या पुरस्काराचे वितरण सोहळा शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५,रोजी सायं ५ वा.
मातृमंदिर, ढगे मळा, कुर्डूवाडी रोड, बार्शी. येथे
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या हस्ते आणि ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, संतोष काका ठोंबरे, विनयकुमार संघवी, प्राचार्य चंद्रहास गंभीर. यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार पद्य विभागात कवी माधव पवार.
यांच्या ‘गरुडभरारी’ काव्यसंग्रहाला देण्यात येणार आहे. यापूर्वी पवार यांच्या ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ काव्यसंग्रहासही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल साहित्यक्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


























