सांगोला – रयत शिक्षण संस्थेच्या सांगोला तालुक्यातील मांजरी हायस्कूल येथील सहशिक्षक प्रमोद अरविंद डोंबे यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन २०२६-२०२७ रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते व खा.सुप्रिया सुळे, शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मगर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
हा सन्मान सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन या विषयावर नवोन्मेष, संशोधनात्मक दृष्टिकोन आणि गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही फेलोशिप प्रमोद डोंबे यांना प्रदान करण्यात आली.
यासाठी त्यांना रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव पवार, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी जगदाळे, सहा.विभागीय अधिकारी निकम, दाभाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम रायभान, पर्यवेक्षक मासाळ व सर्व सेवक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
























