माळीनगर – सदगुरू गहिनीनाथ अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अकलूज या बँकेच्या नूतन चेअरमनपदी माळीनगरचे अॅड शिरीष ताराचंद फडे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
सदगुरू गहिनीनाथ अर्बन बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडीसाठी मंगळवार दि.४ रोजी बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेचे अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था अकलूज
पी.आर.सारडा होते . त्यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी नूतन चेअरमनपदी अॅड शिरीष फडे यांची निवड झाल्याबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. फडे यांनी यापूर्वी बँकेचे व्हा.चेअरमन म्हणून गेली २० वर्ष उत्तम व योग्यरितीने कामकाज पाहिले आहे.
या निवडी प्रसंगी बँकेचे संचालक प्रकाश पाटील, संमती सोनाज,डॉ.विठ्ठल कवितके,अजितकुमार गांधी, भरतेश वैद्य,निलेश गिरमे,रमेश तोरणे,श्रीमती प्रभावती काळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे आदि कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी –
सद्गुरु गहिनीनाथ अर्बन बँकेच्या नूतन चेअरमनपदी ऍड शिरीष फडे यांची निवड झाल्याबद्दल सत्कारा प्रसंगी प्रकाश पाटील,संमती सोनाज,डॉ.विठ्ठल कवितके,अजितकुमार गांधी, भरतेश वैद्य,निलेश गिरमे,रमेश तोरणे,श्रीमती प्रभावती काळे,नंदकुमार गोरे.


















