Sunday, February 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शीच्या शिवसृष्टी येथे सुयश विद्यालयाची शिवजयंती उत्साहात साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
February 22, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुयश विद्यालय, बार्शी यांच्यावतीने शिवसृष्टी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मा.आमदार राजाभाऊ राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करुन करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक मर्दानी खेळांचे प्रभावी सादरीकरण करुन उपस्थितांना शिवकालीन शौर्याची अनुभूती करुन दिली. झांज पथकाच्या दमदार तालावर परिसर दणाणून गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी बालमावळ्यांनी शिवगीतांवर सादर केलेले नृत्य विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणातून शिवभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाची भावना प्रकट झाली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिवाजी महाराजांचा पाळणा हा कार्यक्रमाचा अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी भाग ठरला. 

श्री. राजाभाऊ राऊत यांनी विद्यार्थ्यांचे आणि विद्यालयाचे विशेष कौतुक करताना सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, संस्कार आणि देशभक्तीची भावना दृढ होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाली असून उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Post Views: 22
Previous Post

सराफाकडून ७ लाख ९० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त

Next Post

सरपंच पदी सुरेखा दिवटे तर उपसरपंच पदी नरसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सरपंच पदी सुरेखा दिवटे तर उपसरपंच पदी नरसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

मोहोळ मध्ये अचानक उभारला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.#public #sambhajimaharaj #maratha #viral

February 22, 2026

नागपूरात दोन पेपर फुटले…#10thmaths #10thexam #public #solapurnews #viral

February 22, 2026

एज्युकेशन सोसायटी संचलित, पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्सव व बक्षीस वितरण

February 22, 2026

चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक महाराज मंदिराला सुवर्ण कळस अर्पण

February 22, 2026

सराफ व्यापाऱ्याला चारचाकी वाहनाने धडक देऊन लुटण्याचा प्रयत्न

February 22, 2026

‘A+’  मूल्यांकन प्राप्त सोलापूर शहरातील एकमेव श्री दिगंबर जैन गुरुकुल शाळा

February 22, 2026

मातोश्री आशाताई अंबादास सरगम सेंट्रल स्कूल, येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचा उत्साहात समारोप

February 22, 2026

महर्षि संकुल यशवंतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0694494

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697