वेळापूर – तालुका माळशिरस येथील योद्धा प्रतिष्ठान यांच्यावतीने भक्ती निवास येथे विविध उपक्रमाने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त महादेव देवालय ट्रस्ट येथे योद्धा प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे श्रीफळ फोडून पुष्पहार अर्पण करून पूजन करून आरती करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक मदनसिंह माने देशमुख, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे, माजी जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे , संदीप माने देशमुख, काकासाहेब जाधव, गोपाळ घाडगे, गणेश चव्हाण, भय्या मिरगे, पिनू येडगे, महेश साठे, ओंकार खराडे, शिवजयंती समिती अध्यक्ष निखिल शिंदे यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच शिवजयंतीनिमित्त महिलांची भगवे फेटे बांधुन वेळापूर शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष होत होता सोबत हरिनामाचा .जयघोष करत .वारकरी सांप्रदाय .लहान मुले वारकरी वेश परिधान करून भजन टाळ मृदुंग .यांच्या आवाजाच्या तालावर घोषणा देत वेळापूर शहरातून रॅली शिवाजी महाराज चौकातुन पुढे भक्तनिवास येथे येऊन महिला रॅलीची सांगता झाली. तसेच शिवजयंती निमित्त भक्तनिवास येथे आरोग्य शिबिर आयोजन केले होते.
या शिबिरात हृदय तज्ञ डाॅ. ईनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर संपन्न झाले . तसेच योद्धा प्रतिष्ठान अंतर्गत मुलींन साठी छत्रपती शिवाजी महाराज चरित्रांतर्गत व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये यशस्वी विद्यार्थिनींना बक्षीस वितरण करण्यात आले. व सायंकाळी भक्ती निवास येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम पार पडण्यासाठी योद्धा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

























