सांगोला – आमचे नेते शहाजीबापू असून बापूंसाठी सर्व ताकदीनिशी शिवसेना व शिंदे कुटुंब पाठिमागे राहील असा शब्द खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिला. मुंबई येथे शिवसेना पक्षाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आढावा घेण्यात आला. सांगोला तालुक्याचा आढावा घेत असताना ते बोलत होते.
यावेळी माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका ताकतीनिशीन लढू व कार्यकर्त्यांना न्याय देऊन विजयश्री खेचून आणू असा शब्द दिला. याप्रसंगी आ.विजयबापू शिवतारे यांनी सांगोला तालुक्यामध्ये आवश्यक निवडणुकीसाठी लागणाऱ्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी पक्षाचे सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, नीलम गोरे उपस्थित होते. या बैठकीस सांगोल्यातून सागर पाटील, दादासाहेब लवटे, प्रा.संजय देशमुख, आनंदा माने, जगदीश पाटील, गुंडादादा खटकाळे, दीपक दिघे, आनंदा घोंगडे, प्रशांत धनवजीर, अस्मिर तांबोळी, माऊली तेली, सोमेश यावलकर, विजय शिंदे, समीर पाटील, अजिंक्यराणा शिंदे, रवी शिंदे, अमित पाटील, दादासाहेब काळे, राजेंद्र हजारे, संजय मेटकरी, भाळवणी गटाचे धनंजय काळे उपस्थित होते.