सोलापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभा या मतदारसंघातील शाखाप्रमुख , बूथ प्रमुख, पोलिंग एजंट यांची बैठक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते शरद कोळी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड , संपर्कप्रमुख अनिल कोकीळ , लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थित बैठक पार पडली.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील ,युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, उपजिल्हा प्रमुख खंडू सलगरकर , लोकसभा संघटक प्रमुख शरणराज केंगनाळकर , दक्षिण संघटक सय्यद सत्तार, महानगर प्रमुख दत्ता माने , समन्वयक गणेश कर्वे, महिला आघाडी संघटक मीनल दास, दक्षिण तालुकाप्रमुख रवी घंटे , सखाराम वाघ, उपतालुका प्रमुख संदीप मेंडगुदले, उपशहर प्रमुख संतोष घोडके ,सचिन माने, सोशल मीडिया प्रमुख विकास डोलारे व इतर शाखा प्रमुख विभाग प्रमुख व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.




















