तभा फ्लॅश न्यूज/ जमीर काझी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आ. अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम व त्यांचे वडील रामदास कदम यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. परब यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्या मालकीच्या बारवरून गेल्या 2 वर्षात पोलिसांनी 3 वेळा छापा टाकल्याची माहिती पुराव्याशी माहिती दिली. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो तोही पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे गृहराज्य मंत्री नवी मुंबई पर्यंत डान्सबारवर रेड टाकायला जातात. पण स्वतच्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतो त्यावर कोण कारवाई करतो? असा सवाल करीत त्यांचा राजीनामा घेईपर्यत मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कांदिवलीतील सावली बारवर 2023 पासून करण्यात आलेल्या पोलिसांच्या कारवाईची माहिती देऊन परब म्हणाले,’अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृह आणि महसूल राज्यमंत्र्यावर आरोप केले. त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला बार आहे, त्यात डान्सबार चालवला जात होता. अश्लील नृत्य, पैसे उडवले जात होते. मी सर्व माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. ही माहिती खोटी असू शकत नाही.
आरटीआय मध्ये दिलेल्या माहितीत २२ बारबाला, २२ गिऱ्हाईक आणि चार कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे. बारचे नियम तुडवले गेले आहेत. परंतु याबाबत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी की पत्नीच्या नावाने आर्केस्टा असून दुसऱ्याला चालविण्यास दिल्याचे सांगितले. जो चालवतो त्याच्यावर जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले, पण कायद्याच्या तरतुदी आणल्या आहेत. तुमच्या नोकराने, किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलं त्याने एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कुणाकडे. एक नोकरनामा असतो.
तुम्ही कुणाशीही अग्रीमेंट करा, त्याला काही किंमत नाही. कोणताही डान्सबार चालवताना एक नोकरनामा असतो. त्यात चालवणाऱ्याची माहिती द्यावी लागते. माझ्याकडे नोकरनामा आहे. त्यावर मालकाला सही करावी लागते. एखादे कृत्य तुमच्यावतीने जो प्राधिकृत झाला आहे, त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय? जो काम करत असेल तो जबाबदार असला तरी हे कृत्य ज्याच्या नावाने परवाना आहे, त्याने केले समजले जाते. याठिकाणी दोन वर्षात 3 वेळा कारवाई झाली आहे, तरी त्यांना कशी माहिती कळत नाही? हे सगळे मिलिभगत मधून होत असल्याचे स्पष्ट आहे.
टोला परब यांनी कदम यांना लगावला
आम्हाला माहीत नव्हतं असं म्हणत असतील तर ३१ तारखेला रेड झाली, तशीच २८ मे २०२३ रोजी झाली होती. दुसरी रेड 10/8/2023 ला झाली होती. म्हणजे दोन दोन रेड या बारवर झाल्या आहेत. याचे पुरावे आहेत. तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, पोरी चालवल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे. हे माहीत असून तुम्ही काळजी
मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या निमित्ताने भेट रूपाने त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रताप देणार होतो. पण ते आज गडचिरोलीला आहे, असा चिमटा परबांनी काढला. उद्या त्यांना मी हे कागद देणार आहे. डान्सबार आईच्या नावाने आहे मान्य केलंय. डान्सबारचे नियम आहे, ते तुडवले आहे. त्यात महिलांना किती वाजेपर्यंत ठेवायचं याचा कायदा आहे. ९च्या नंतरही ठेवता येत नाही. ऑर्केस्ट्रा असेल तर पाच मुलीच काम करतात. पाच मुलींनाच परमिशन देण्याचा नियम असताना १४ मुली काय करत होत्या. मुली स्टेजवरून खाली उतरू शकत नाही. पोलिसांचं रेकॉकर्डिंग असं आहे ज्याच्यात नृत्य करताना, लगट करताना आणि पैसे उधळतानाच्या गोष्टी आल्या आहेत.
या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी. मी प्रत्येक आठवड्याला मुख्यमंत्र्यांना स्मरण पत्र देणार आहे. काय कारवाई केली विचारणार आहे, असेसांगून ते म्हणाले, कदम
आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे भरपूर प्रताप आहे. टप्प्या टप्प्याने बाहेर काढू. प्रदूषण मंडळात किती रेड झाल्या. त्याचं पुढे काय झालं. चाकणच्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही. या सर्व गोष्टी आमच्याकडे आल्या. हळूहळू टप्याटप्प्याने आम्ही गोष्ट घेणार आहे.
आईची बदनामी करत आहेत, आईची बदनामी करत आहेत असं ते म्हणतात ना. अरे लाज वाटली पाहिजे आपल्या बायकोच्या नावाने अशा प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला. शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्राची मान खाली घातली. त्यात अश्लील डान्स चालतो. त्यात अश्लीलता पसरवली जाते. तुम्ही गृहराज्यमंत्री आहात. आईच्या नावाला बट्टा लावला असल्याचे सांगितले.
Post Views: 14