वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी ) बजाजनगर येथील शिवसेना ( उबाठा) गटाचे विशाल खंडागळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची आज उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. ही निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर , शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते शिवसेना पश्चिम मतदार संघाच्या उपतालुकाप्रमुखपदी श्री. विशाल खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राजकिय जीवनाची सुरुवात केली कालांतराने त्यानी भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख पदी पर्यंत मजल मारली. पक्षाने नेहमी त्यांच्या कामाची पावती त्यांनी दिली. तद्नंतर युवासेना स्थापन झाल्या पासून त्यांनी संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात युवकांचे संघटन करून पक्षात सामील करून घेतले व विविध सामाजिक कार्य देखील चालू ठेवली तेव्हा पक्षाने तालुका समनव्यक पदाची जबाबदारी दिली.
त्यांची पक्षा बद्दल असलेली निष्ठा लक्षात घेऊन या पदाची जबाबदारी देण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्थरातून अभिनंदन होत आहे.. त्यांच्या निवडवेळी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, बाप्पाजी दळवी, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, शहर प्रमुख सागर शिंदे, विभागप्रमुख विनोद दाभाडे, राजू दहातोंडे आदींची उपस्थिती होती.