सोलापूर – महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती झाली. मात्र झालेली युती पालकमंत्र्यांना सलत असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री जया भाऊंच्या बोलण्यातून तसे दिसून येत असल्याने सर्वत्र पालकमंत्र्यांच्या “त्या वास्तववादी” बोलण्यावरून चर्चा रंगू लागली आहे.
शिवसेना राष्ट्रवादी यांच्या युतीनंतर प्रसारमाध्यमांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत वार्तालाप केला असता, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिंदेसेनेवरच शब्दगोळे फेकले आहेत. “वास्तववादी प्रस्ताव देण्यासंबंधी मी वारंवार सांगत होतो.” परंतु तसा प्रस्ताव त्यांच्याकडून आला नाही. ताकदी पेक्षा जास्त अवस्था जागा मागितल्यामुळे युतीची चर्चा फिसकटली. तरीदेखील शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना चर्चा करण्याची सांगितले असता, शिंदेसेनेचे प्रमुख नेते आपल्या मागणीवर ठाम होते. “लेट नाईट” फोन कॉल्स आला. मात्र त्यावर निर्णय घेता आला नाही. शेवटी शिंदेसेनेच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या बोलण्यातून शिंदेसेनेच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ? जया भाऊंच्या म्हणण्यानुसार शिंदेसेनेने वास्तवादी प्रस्ताव दिला नव्हता.. अवास्तव जागा मागितल्यामुळे त्यावर अंतिम निर्णय घेता आला नाही. युती तुटण्याचे खापर त्यांनी शिंदे सेनेवरच फोडले तसा रोख त्यांच्या बोलण्यातून दिसून आला. वास्तविक पाहता शिवसेनेने पहिल्या दिवसापासून युती संदर्भात ग्रीन सिग्नल दाखवले होते. परंतु भाजप मोठ्या भावाच्या आविर्भावात वावरात असल्याने त्यावर साधक-बाधक चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नगरपरिषद नगरपालिका निवडणुका झाल्या आणि निकाल लागल्यानंतर मात्र भाजपने शिंदेसेने सोबत युती करण्यासंबंधी तयारी दर्शवली. परंतु सत्ताधारी भाजप पक्ष दोन पावले मागे जाण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदेसेनेचे प्रमुख नेत्यांनी देखील युतीच्या वाटाघाटी बंद केल्या.
मात्र राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीसंबंधी प्राथमिक चर्चा झाली परंतु ती चर्चा अंतिम निर्णय घेणारी ठरली. भरणे मामांनी रातोरात मोबाईल फिरवला आणि दादांचे आणि एकनाथ भाईंची बोलणी घडवून आणली. त्याच ठिकाणी युतीचा कांडका पाडला. परंतु एका रात्रीत एवढे सगळे काही घडेल हे भाजपला कळलेच नाही.. आपल्या हातातून वाळू सरकली.. त्याप्रमाणे शिंदेसेना निसटल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर भाजपने मंत्री पूर्ण लढतीचा बाण तयार केलेला दिसत आहे.


























