Saturday, February 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवरायांची प्रगतीशील धोरणे आणि जलव्यवस्थापन स्वराज्याच्या समृद्धीचा पाया : डॉ. दत्तात्रय मगर

तरुण भारतbyतरुण भारत
February 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ युद्धे जिंकली नाहीत, तर शेती, व्यापार आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देणारी प्रगतीशील धोरणे राबवून स्वराज्याला आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले. किल्ले, रस्ते आणि सिंचन व्यवस्थेवर त्यांनी दिलेला भर हा आधुनिक विकासाचा पाया ठरला, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास विश्लेषक डॉ. दत्तात्रय मगर यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरत्‍न नॉलेज सिटी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा अकलूज, सिंहगर्जना ग्रुप, जाणीव मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैचारिक परिसंवाद व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आयोजित व्याख्यानात डॉ.मगर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सभापती इशिता मोहिते-पाटील, व्याख्याते प्रा.सुहास उरवणे, डॉ.पांडुरंग नलवडे, प्रा.अनिल लोंढे, विक्रम वैद्य, डॉ.अमोल माने शेंडगे, अनिल जाधव, डॉ. विश्वनाथ आवड यांच्यासह इतिहासप्रेमी उपस्थित होते.

डॉ. मगर म्हणाले, “विभाजित भूमीत धार्मिक सहिष्णुतेचे राज्य स्थापन करणे हे महाराजांचे मोठे यश होते. त्यांनी मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांविरुद्ध लढा देतानाच, परकीय आक्रमणांपासून सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तिशाली नौदलाची उभारणी केली. त्यांच्या लष्करी कौशल्याने आणि रणनीतीने रयतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या राजवटीत, मराठा साम्राज्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भरभराटीला आले. त्यांनी व्यापार, वाणिज्य आणि शेतीला चालना देण्यासाठी प्रगतीशील धोरणे राबवली, ज्यामुळे समृद्धी आणि विकासाचे वातावरण निर्माण झाले. किल्ले, रस्ते आणि सिंचन व्यवस्था बांधण्यासह पायाभूत सुविधांच्या विकासावर शिवाजी महाराजांचा भर असल्याने साम्राज्याची लवचिकता आणि बाह्य धोक्यांना तोंड देण्याची क्षमता आणखी वाढली.”

डॉ.अनिल लोंढे म्हणाले, १८७० मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शिवरायांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवजयंतीची सुरुवात केली. आज हा एक राष्ट्रीय उत्सव बनला असून, तो समाजाला शौर्य आणि लवचिकतेचे महत्त्व पटवून देतो. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

प्रा.सुहास उरवणे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही म.बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते. एकूणच त्यांनी वचनसाहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधूता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत. सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा, भेदभाव व जातीय राजकारण इ.समस्यावर आळा घालता येईल. परिणामतः चांगले सुशासन व प्रशासन व्यवस्था निर्माण होइल.

डॉ.विश्वनाथ आवड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचे दुःख होते. त्यांना केवळ जातीव्यवस्था आणि उच्च आणि नीच दर्जाच्या भेदभावाचा अनुभव आला नाही तर त्यामुळे त्यांना अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागला. त्यांनी आयुष्यभर या अन्यायाविरुद्ध लढा दिला. अस्पृश्यतेसारख्या अमानवी प्रथांपासून खालच्या जातींना मुक्त करणे आणि त्यांना समाजात समान हक्क आणि आदर प्रदान करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते.

विक्रम वैद्य म्हणाले, गड-किल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे. आपण जंगल पाहायला नक्की जातो, पण दुर्दैवाने आपले ‘शहर’  मात्र मागे सोडून जात नाही. ऐतिहासिक वास्तूंचे आणि त्या जागेचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. गड-किल्ले हे केवळ मोबाईल किंवा सोशल मीडियावर बघून अनुभवण्याच्या गोष्टी नाहीत, तर तिथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास अनुभवला पाहिजे.

अनिल जाधव म्हणाले, तरुणाईला सोशल मीडियाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना इतिहासाशी जोडण्यासाठी ‘वैचारिक परिसंवादांचे’ आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिसंवादातून महापुरूषांचे आचार आणि विचार अनुभवणे महत्वाचे आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागनाथ साळवे यांनी केले.

Post Views: 9
Previous Post

जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम

Next Post

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!

ताज्या बातम्या

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

February 21, 2026

दांडपट्टा फिरविण्यात सोनाक्षी मोहन माडे हिचा विश्वविक्रम

February 21, 2026

शिवजयंतीनिमित्त ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

February 21, 2026

खाजाभाई बागवान यांच्या सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रज्ञा प्रेरणा पुरस्कार जाहीर

February 21, 2026

वालचंद महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

February 21, 2026

स्केटिंग स्पर्धेत व्हॅलेंटाईन सर्कलच्या लास्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

February 21, 2026

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष!

February 21, 2026

शिवरायांची प्रगतीशील धोरणे आणि जलव्यवस्थापन स्वराज्याच्या समृद्धीचा पाया : डॉ. दत्तात्रय मगर

February 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0689875

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697