सोलापूर – नुकतेच बंगलोर येथे पार पडलेल्या भावसार व्हिजन च्या अधिवेशनात सोलापूरच्या भावसार व्हिजन चे माजी अध्यक्ष श्री शिवाजी उपरे यांची 2027 च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली असून तसेच क्लबचे माजी अध्यक्ष गिरीष पुकाळे यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड झाली आहे.
श्री शिवाजी उपरे हे भावसार व्हिजनचे संस्थापक सदस्य असून गिरीष पुकाळे हे देखिल भावसार व्हिजन मध्ये 2009 पासून कार्यरत आहेत.
शिवाजी उपरे व गिरीष पुकाळे यांनी भावसार व्हिजन मध्ये अनेक पदावर कार्य केले आहे.
शिवाजी उपरे हे भावसार व्हिजन शिवाय रोटरी क्लब सोलापूर, सोलापूर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उप नगरी शाखा व मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत.
शिवाजी उपरे यांनी 2015 साली सोलापूर भावसार व्हिजन क्लबचे अध्यक्ष असताना पहिल्यांदा क्लबला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ क्लबचा सन्मान त्यांनी मिळवून दिला तर 2019 साली पहिल्यांदा श्री गिरीष पुकाळे यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ठ अध्यक्ष या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या दोघांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय निवड समितीने त्यांची एकमताने अनुक्रमे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय सचिव पदी निवड केली आहे.
श्री शिवाजी उपरे हे इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत असून याशिवाय ते सोलापुरातील एक प्रमुख नाट्य वितरक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. श्री. गिरीष पुकाळे हे ऑटोमोबाईल इंजिनीअर असून, सोलापुर महानगरपालिकेत वाहन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल भावसार समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


















