तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय सिडको येथील विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती परीक्षेत गेल्या काही वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सदरील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे उपमुख्याध्यापक रवी जाधव यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी विद्यालय सिडको येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून आपल्या शाळेचे नावलौकिक केले आहे. सदरील विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले.पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) मध्ये विद्यालयातील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले तर पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) विद्यालयाचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.पाचवीतील रुद्र अमोल पेन्शनवार,जोशी स्पृहा प्रसाद,तुपकरी लक्ष गजानन,शिरसे लक्ष्मण सुमेध व मळगे वरद अशोक हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत .तर इयत्ता आठवीतील पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.यामध्ये लिंगसेकर मंदार मयूर,नरवाडे मिथिलेश,बागे गणेश राजू,पांडे प्रज्वल दिलीप व जाकोरे प्रशांत प्रकाश या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.शाळेच्या वतीने शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्याध्यापक रवी शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. साहेबराव देवरे, पर्यवेक्षक विकास पाटील,मुख्य लिपीक वसंत वाघमारे , गणेश जाधव,एम.जी.स्वामी,
आर.के.चंदनशिवे,पालक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.