शहरातील मुळेगाव रोड येथील सरवदे नगरातील एकाच कुटुंबातील महिलेने आपल्या मुलगा व मुलीसह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्नेहा संतोष चिल्लाळ वय 30, संध्या संतोष चिल्लाळ वय 11, मनोजकुमार संतोष चिल्लाळ वय 7 असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला. या ठिकाणी घरामध्ये साडीच्या साह्याने तिघांनी गळफास घेतल्याचे पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्यांना बोलवून हे तीनही मृतदेह खाली उतरवले. सदरचे मृतदेह सिविल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच सरवदे नगर मध्ये नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...




















