सोलापूर – सोलापूर येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे झालेल्या राज्य शालेय डायव्हिंग स्पर्धेत स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आर्ट्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज देगावची श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने १९ वर्षाखालील वयोगटात हायबोर्ड, १ व ३ मीटर स्प्रिंगबोर्ड या तिन्ही क्रीडा प्रकारात ३ सुवर्ण पटकावून हॅट्ट्रिक केली आहे.
तिला आंतरराष्ट्रीय कोच श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर, विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य आर. व्ही. खांडेकर, क्रीडाशिक्षक श्री बेलुरे यांनी श्रावणीचे अभिनंदन केले.


















