सांगोला – अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी पादुकांचे सांगोला शहरात वाडेगाव नाका येथे मोठ्या उत्साहात भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आले. फॅबटेक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य संजय भैस, सांगोला येथील संयोजक विठ्ठल देशपांडे यांच्या हस्ते व प्रा.राऊत, प्रा.कांबळे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
पालखी समोर वारकरी महिला, भजनी मंडळ होते. जागोजागी महिलांनी औक्षण केले. तसेच अनेक ठिकाणी सडा-रांगोळ्या काढल्या होत्या. पालखी महादेव गल्ली, देशपांडे गल्ली, कोष्टी गल्ली, मनेरी चौक, हनुमान मंदिर, जुना कोर्ट रोड, छत्रपती शिवाजी चौक मार्गे नेहरू चौकातून स्टेशन रोड, महात्मा फुले चौकातून श्री समर्थ कॉम्प्लेक्स येथे मुक्कामास थांबली आहे.
यावेळी संयोजक त्याचप्रमाणे स्वामीभक्त मोठ्या संख्येने हजर होते. असंख्य भक्ताने स्वामी पादुकांचे दर्शन घेतले. मंगळवार दि.१८ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता पालखीचे प्रयाण पुढील परिक्रमेसाठी होणार आहे.



















