पंढरपूर – सुस्ते येथील ग्रामदैवत श्री अंबिका देवस्थानास ‘क’ दर्जा मिळवुन या देवस्थानाला 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून चांगले पर्यटन क्षेत्र तयार करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले.
सुस्ते येथील श्री अंबिका उद्योग समूहाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिपावलीच्या लक्ष्मी पुजन दिनाचे औचित्य साधून श्री अंबिकादेवीच्या छबिण्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी ग्रामदैवताची आरती आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी श्री अंबिका देवस्थानाला ‘क’ वर्ग दर्जा मिळवा अशी मागणी केली आहे.यासाठी मला लवकर प्रस्ताव द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे यासाठी अर्ज करू. हा दर्जा मिळाल्यानंतर या श्री अंबिका देवस्थानाच्या सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून चांगले पर्यटन क्षेत्र तयार करू असे आमदार पाटील यांनी सांगितले.
गेल्या 13 वर्षापासून सुरवसे बंधू श्री अंबिका देवीची पालखी सोहळा काढून अन्नदान करतात त्यांची छोट्या व्यवसायापासून सुरवात झाली असून त्याचे रूपांतर उद्योग समूहात झाले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक घरात विजय सुरवसे व शंकर सुरवसे यांच्यासारखे उद्योजक तयार झाले पाहिजेत असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी श्री अंबिका देवी उद्योग समूहाच्यावतीने संपूर्ण गावातून वाजत गाजत श्री अंबिकादेवीच्या पालखीचा छबिना काढण्यात आला. यावेळी फटाक्याची आतिषबाजीने करण्यात आली. हा पालखी छबीना अंबिका मंदिर परिसरात दाखल होताच फुलाची मुक्त उधळण करून पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते अंबिकादेवीची आरती करण्यात आली. सूत्रसंचालन वैजनाथ रणदिवे यांनी केले.
यावेळी डीव्हीपी उद्योग समुहाचे आनंद पाटील, विठ्ठल साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक दिनकर चव्हाण,माजी संचालक रामदास चव्हाण,राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण,भीमा साखर कारखान्याचे संचालक तात्यासाहेब नागटिळक, माजी उपसरपंच तुषार चव्हाण,विठ्ठल पाटील,धनंजय कोताळकर,धनंजय घाडगे, डीव्हीपी बॅकेचे संचालक अनिल यादव, शंकर सुर्वे,विठ्ठल रणदिवे, डॉ.आबासाहेब रणदिवे,जगदंब फायनान्सचे चेअरमन हनुमंत चव्हाण, रंभाजी नागटिळक,गणेश चव्हाण,कांचन पाटील, केशव पवार,पै.शिवाजी शिनगारे,समाधान चव्हाण,विष्णू चव्हाण, बाळासो जाधव, हनुमंत नागणे, साहेबराव काळे, अक्षय नलवडे, सतीश सुरवसे, विष्णू गावडे,अण्णासाहेब ताटे, महादेव ताटे आदी उपस्थित होते.




















