माहूर / नांदेड – श्री दत्तात्रेय संस्थान शिखर, माहूरगड येथील श्री दत्त जन्मोत्सव सोहळा
गुरुवार दि. २७/११/२०२५ ते शनिवार दि. ०६/१२/२०२५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
आज मार्गशीर्ष शु.०७ गुरुवार दि. २७/११/२०२५ रोजी घटस्थापना व निशान पूजनाने सर्वतीर्थ कुंड येथून या दत्त दत्त सोहळ्याला मोठ्या भक्तिभावाने उत्साहात सुरुवात झाली आहे.
श्री दत्तात्रेय संस्थान दत्तशिखर माहूरगड श्री श्री १००८ महंत मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज दत्त महाराजांची सर्व तीर्थ येथे जाऊन घटस्थापना करण्यात आली. वासुदेव भारती महाराज मुख्य पुजारी यांच्या उपस्थितीत घटस्थापना पूजन आरती करण्यात आली.याचे पौरोहित्य रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी, विकास जोशी या ब्राह्मवृंदांनी केले.
यावेळी सर्वप्रथम सर्वतीर्थ कुंड येथे जाऊन कलशाला अभिषेक त्यानंतर निशान पूजन, आरती, नैवेद्य वगैरे दाखवून सर्व निशाण घेऊन दत्तशिखर येथे घट स्थापना करण्यात आली.
मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज ,चिरंजीव भारती, वामन भारती,माधवगिरी महाराज, सुजान भारती, नितेश भारती, शिलानंद भारती ही सर्व साधू महाराज मंडळी उपस्थित होती.
श्री दत्तात्रेय संस्थान शिखर, माहूरगड येथील श्री दत्त जन्मोत्सव सोहळा गुरुवार दि. २७/११/२०२५ ते शनिवार दि. ०६/१२/२०२५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
मार्गशीर्ष शु.०७ गुरुवार दि. २७/११/२०२५ रोजी घटस्थापना व निशान पूजनाने सर्वतीर्थ कुंड येथून या दत्त दत्त सोहळ्याला मोठ्या भक्तिभावाने उत्साहात सुरुवात झाली आहे.
मार्गशीर्ष शु.१० रविवार दि. ३०/११/२०२५ श्री दत्त महाराजांची पहिली पालखी पं.पू. महंत महाराजांच्या उपस्थितीत पालखी सोहळा सुरुवात होणार आहे. पालखी झाल्यानंतर देवकते महाराज छ. संभाजीनगर, बबन महाराज पुसदकर व दत्त गिरी महाराज संच यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मार्गशीर्ष शु.११ सोमवार दि. ०१/१२/२०२५ श्री दत्त महाराजांची दुसरी पालखी देवकते महाराज व संच यांचा कीर्तन सोहळा या दिवशीही होणार आहे.
मार्गशीर्ष शु.१२ मंगळवार दि. ०२/१२/२०२५ श्री दत्त महाराजांची तिसरी पालखी निघणार आहे.
मार्गशीर्ष शु.१३/१४ बुधवार दि. ०३/१२/२०२५ रोजी श्री दत्त महाराजांची चौथी पालखी निघणार आहे. यादिवशी श्री दत्त महाराजांचा अभिषेक प.पु. महंत महाराजांच्या हस्ते व सभामंडपामध्ये श्री दत्त जन्म सोहळा कीर्तन व दत्त जन्म अध्याय वाचन केले जाणार आहे.
मार्गशीर्ष शु.१५ (पौर्णिमा) गुरुवार दि. ०४/१२/२०२५ श्री दत्त महाराजांची पाचवी पालखी निघणार आहे.
शुक्रवार दि. ०५/१२/२०२५ रोजी प.पु. महंत महाराजांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दि. ०६/१२/२०२५ रोजी प.पु. महंत महाराजांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता काकडा आरतीने संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
भाविकभक्तांनी श्री दत्तात्रेय प्रभु यांच्या जन्म सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा व आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तात्रेय संस्थान शिखर, माहूरगडच्यावतीने करण्यात आले आले आहे.
भाविकांनी प्रभु दत्तात्रेय यांच्या जन्म सोहळ्याला उपस्थित राहून शांततेत दर्शनाचा व आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री दत्तात्रेय संस्थान शिखर माहूरगड तथा यात्रा नियोजन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



















