जालना – जुना जालन्यातील बचत भवनमागे असलेल्या योगेश्वरी कॉलनी भागात वेद शास्त्री संपन्न श्री.रामदास महाराज आचार्य यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहास रविवार दि.२८ डिसेंबर रोजी दुपारी प्रारंभ झाला. स्व. पद्माकरराव अकोलकर यांच्या स्मरणार्थ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजक मोहिनीराज कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रामदास महाराज आचार्य यांची पाद्यपूजा केली. त्यानंतर कथेच्या सादरीकरणास आचार्य महाराज यांनी सुरूवात केली.
यामध्ये भाविकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. दररोज दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान कथेचे सादरीकरण होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. छायाचित्र किरण खानापुरे



























