अक्कलकोट – पुण्यातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने नुकतेच सुरूवात करण्यात आलेल्या मोफत शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांना श्री स्वामींचे आशिर्वाद लाभावे असे मनोगत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानला सपत्निक भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी संजीव जावळे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देवून यथोचित सन्मान केला. यावेळी संजीव जावळे बोलत होते.
पुढे बोलताना संजीव जावळे यांनी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे पाठबळ यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या या मोफत शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमांना नक्कीच मोठा आधार मिळेल असा मनोदय व्यक्त करून हे कार्य भविष्यात अविरतपणे सुरू राहण्याकरिता श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहावे याकरिता आज येथे श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, डॉ.हिरण्णा पाटील, संतोष वराळे, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – संजीव जावळे यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सपत्नीक सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.


























