सोलापूर – अक्कलकोटचे माजी आमदार ,भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर कुमठे या त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थित जनसागरानं आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला
अक्कलकोटचे माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष अशी ओळख असणारे लोकनेते सिद्रामप्पा पाटील यांचं अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झालं होतं त्यांच्या निधनानं सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली अक्कलकोट तालुक्यात आप्पांच्या निधनानं तीव्र शोक व्यक्त करण्यात आला.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेतेगण, पदाधिकारी, सामाजिक संस्था संघटना आदींकडून सिद्रामप्पा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील कुमठे या गावी नेण्यात आलं इथे आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला होता अक्कलकोट तालुक्यासह राज्यातील विविध भागातून लोक अंत्यदर्शनासाठी कुमठे इथं दाखल झाले सामाजिक राजकीय क्षेत्रासह शासन प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आदींसह समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
आपली श्रद्धांजली अर्पण केली तसंच पाटील कुटुंबीयांचं सांत्वन केलं निशब्द आणि स्तब्ध अशी इथली शोकाकुल अवस्था राहिली ज्यांनी आयुष्यभर शेतकरी वर्गासाठी अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली लोकांना न्याय देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं प्रसंगी मोठा संघर्ष केला असा लढवय्या अन खंबीर नेता आज आपल्यात नाही हि वास्तवता मनाला चटका अन वेदना देणारी होती आणि ती प्रत्येकाच्या चेहऱयावर स्पष्टपणे दिसून येत होती पाटील कुटुंबियांच्या दृष्टीने न पेलवणारा असा हा दुःखाचा डोंगर अन प्रसंग होता कुमठे गावात जिकडं पाहावं तिकडं शोकाकुल असं वातावरण होतं स्वर्गीय आप्पानी सर्वांना सोबत घेऊन आपली राजकीय वाटचाल राखली अनेक कार्यकर्ते घडवले अनेक नेत्यांशी समाज घटकांशी त्यांचा ऋणानुबंध राहिला आणि यातील प्रत्येक जण आज आप्पाना अखेरचा निरोप देण्यासाठी जड अंतःकरणाने उपस्थित होता दुःख व्यक्त करायचं म्हटलं तरी शब्दांना भावनांचा बंध दिसून येत होता.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी लोकनेते स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावरअंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित जनसागरानं आपल्या लाडक्या नेतृत्वाला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
यावेळी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, शिवानंद शिवाचार्य महास्वामी,मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामी,करजगीचे शिवानंद शिवाचार्य महास्वामी यांच्यासह कर्नाटकचे कृषी व पणन मंत्री शिवानंद पाटील, इंडीचे आमदार यशवंत गौडा पाटील, आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, स्वामी समर्थ सूत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, विश्वनाथ चाकोते सुरेश हसापुरे, महादेव बहिरगोंडा, रामचंद्र अरवत, एम के फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, कामगार नेते कुमार करजगी, बाबुराव पाटील, हनुमंत कुलकर्णी, मल्लिकार्जुन काटगाव, डॉक्टर अशोक हिप्परगी, प्रकाश हिप्परगी, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, विवेकानंद उंबरजे, दयानंद उंबरजे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ कोडते, जिल्हा परिषद माजी सदस्य अण्णाराव बाराचारे, आनंद तानवडे, नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, कर्नाटकचे पंचपा कलबुर्गी, माजी सभापती चनगोंडा हवीनाळे, महेबुब मुल्ला, अमर पाटील, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, अतुल मेळकुंदे, शंकर म्हेत्रे, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, माजी सभापती आप्पाराव कोरे, परमानंद अलगोंडा, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, अशोक देवकते, वकील बागवान, रमेश बाके, सोलापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे, कुंभारीचे शिरीष पाटील, उदयशंकर पाटील, सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड याबाजी यांच्यासह विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन प्रतिष्ठित नेते मंडळी मोठ्या संख्येन उपस्थित होते.


















