नांदेड – जुन्या भांडणाचा राग मनात धरून सिडको संभाजी चौक येथे शुभम भद्रे व साई वट्टमवार यांच्या वाद होऊन शुभम भद्रे जागीच मृत्यू पावला ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
सिडको भागात साई वटमवार यांनी केलेल्या मारहाणीत २३ वर्षीय शुभम किशन भद्रेरा. संभाजी चौक सिडको नांदेड वय २३ वर्ष याचा मृत्यू झाला. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. शुभमला लाथाबुक्याने गंभीर मारहाण केली.
यामध्ये तो बेशुद्ध पडला तेव्हा त्याला त्याचे नातेवाईकांनी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता. रात्री ८ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळीच भेट देऊन तपास करून आरोपी साई वट्टमवार यास ताब्यात घेऊन जयश्री किशन भद्रे यांच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील आरोपीस गळ्यावर धारदार ब्लेडचा वार आसल्याने तो दवाखान्यात उपचार घेत आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे अधिक तपास करत असल्याची माहिती पो.नि. रोकडे यांनी दिली.




















