सोलापूर : जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव काही दिव सांवर येऊन ठेपलेला असताना अनेक दिवसापासून आचार्य शांतीसागर चौकातील जैन धर्माचे श्रद्धास्थान कीर्ती स्तंभ अंधारात असून याकडे महापालिका सतत दुर्लक्ष करीत असल्याची खंत भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील यांनी व्यक्त केले.
कुठलेही मुलं येतात वाढदिवस साजरी करतात तसेच कायमस्वरूपी घाणीचे साम्राज्य असते कीर्ती स्तंभावरील ग्रॅनाईट उघडले असून तेही लवकर बसवले जात नाही वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका हे काम करत नाही शहरातील थोर पुरुषांचे पुतळे सर्व प्रकाशमय असून कीर्तीस्तंभ अंधारात आहे याकडे आयुक्तांनी लक्ष घालून ठेकेदाराला तसे आदेश द्यावेत अशी मागणी ही असता रोटीचे आनंद तालीकोटी यांनी केली.
या कीर्ती स्तंभाच्या जवळ सेक्युरिटी गार्ड नाही सीसी कॅमेरे चालू नाहीत अशी या कीर्ती स्तंभाची परिस्थिती झाली असून लवकरात लवकर येथील सुविधा द्याव्यात अशी मागणी भारतीय जैन संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते यांनी केली आहे यावेळी भारतीय जैन संघटनेचे श्याम पाटील, अभिनंदन विभूते, आस्था रोटीचे अनंद तालीकोटी सुहास चंचुरे, विक्रांत बशेट्टी, हिराचंद कासार, ओम पाटील आदींनी केली आहे.
























