सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंगगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५–२६ (सेमेस्टर–एक) मधील निकालात संगणक अभियांत्रिकी व यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ रँक मिळवून कॉलेजचा नावलौकिक वाढविला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे यश तृतीय वर्ष बी.टेक (सेम–I) मध्ये करणावर मोनाली व सिरसाट श्रावणी या विद्यार्थिनींनी SGPA 10 व 89.33% गुणांसह विद्यापीठात संयुक्त द्वितीय क्रमांक पटकावला.
याच विभागातील खांडेकर स्वप्निल याने SGPA 10 व 86.33% गुणांसह विद्यापीठात तृतीय क्रमांक, तर खरात सुषमा हिने SGPA 10 व 84.27% गुणांसह चौथा क्रमांक मिळविला. अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकीतील घवघवीत कामगिरी अंतिम वर्ष बी.टेक (सेम–एक) मध्येही संगणक विभागाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
पूजा राठोड हिने 92.83% गुणांसह विद्यापीठात प्रथम क्रमांक, आदित्य बोड्डू (92.41%) – द्वितीय क्रमांक, विशाल मोटे (92.14%) – तृतीय क्रमांक, तेजा शेवाळे (91.59%) – चौथा क्रमांक पटकावला. तसेच हर्षदा भोरे (88.83%) – सातवा क्रमांक, संकेत होमकर (88.69%) व किर्तन करवा (88.69%) – संयुक्त आठवा क्रमांक, तर आदित्य कांबळे (88.55%) यांनी नववा क्रमांक मिळविला.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचाही उल्लेखनीय सहभाग अंतिम वर्ष बी.टेक (२०२५–२६) मधील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनीही विद्यापीठ रँक मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. राऊत प्रशांत यांनी 85.63% गुणांसह तृतीय क्रमांक, चौधरी आकाश यांनी 83.88% गुणांसह सहावा क्रमांक, तर तेजस मेंते यांनी 83.75% गुणांसह सातवा क्रमांक मिळवून विभागाचा गौरव वाढविला.
या उल्लेखनीय यशाबद्दल कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर टी व्यवहारे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध
सातत्यपूर्ण अध्यापन, शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. “Think Placement… Think SINHGAD…!” या ब्रीदवाक्याला साजेसे यश विद्यार्थ्यांनी संपादन केल्याने सिंहगड संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.


















