सोलापूर – जिल्हा परिषद गटातील ६ पैकी ५ गट सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झालेल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात बदललेली राजकीय समीकरणे पाहता कोणाला कुठल्या पक्षाकडून चान्स मिळणार आणि एकाच पक्षात किती गट राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे ६ गट असून पंचायत समितीचे १२ गण आहेत त्याचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले आणि जिल्हा परिषदेचे चक्क ५ गट सर्वसाधारण झाल्यामुळे यावेळेस निवडणुकीमध्ये जत्रा भरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन रचनेनुसार पेनुर,कामती बुद्रुक,कुरुल,नरखेड, आष्टी ,पोखरापूर असे ६ जि. प.गण झाले आहेत. यातील कामती बुद्रुक हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे उर्वरित पोखरापूर वगळता बाकीचे ४ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
मोहोळ पंचायत समिती सदस्याचे आरक्षण जाहीर झाले असून सभापतीपद ओबीसीसाठी राखीव असून पेनूर कुरुल ओबीसीसाठी आहे तेथे महिला किंवा पुरुष उभारू शकतात त्यामुळे कुणाच्या ताब्यात पंचायत समितीची तालुक्याची सूत्रे जाणार याकडे सर्वांचे लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे .
उर्वरित तालुक्यामध्ये पंचायत समितीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे
आष्टी आणि खंडाळी (सर्वसाधारण) नरखेड (सर्वसाधारण महिला ) शिरापूर सो (सर्वसाधारण महिला ) सावळेश्वर (सर्वसाधारण महिला), कामती बुद्रुक (ओबीसी महिला), सय्यद वरवडे (सर्वसाधारण ), पोखरापूर (अनुसूचित जाती महिला), कुरुल (ओबीसी) घोडेश्वर (सर्वसाधारण) टाकळी सिकंदर (अनुसूचित जाती महिला ) एकूण जागा १२
मोहोळ व अनगर नगर परिषद व नगरपंचायत झाल्याने मोहोळ आणि अनगर मधील दीपक गायकवाड, सीमा पाटील, अनगरचे बाळराजे पाटील हे आपोआप स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी
जिल्हा परिषदेच्या ६ जागा असून आरक्षण पुढील प्रमाणे आहे आष्टी (सर्वसाधारण ), नरखेड (सर्वसाधारण ), कामती बुद्रुक (सर्वसाधारण महिला), पोखरापूर (ओबीसी ), पेनुर (सर्वसाधारण), कुरुल (सर्वसाधारण),
यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी एकही जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले नाही जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी साठी असून मोहोळ तालुक्यातून पोखरापूर हा एकमेव जिल्हा परिषद ओबीसी साठी राखीव झाला आहे.*
यामुळे जिपचे अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळराजे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, सौ.शैला गोडसे,
माजी उपसभापती मानाजी माने शिवसेना शिंदे जिल्हाप्रमुख चरण चवरे, आजिंक्यराणा पाटील,राजन पाटील समर्थक रामदास चवरे,पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण,जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी (कामती ) भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण,मोहोळ दक्षिण मंडल भाजपाचे विद्यमान अध्यक्ष रमेश माने,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे राहुल मोरे (वडवळ) जकराया कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव,जालिंदर लांडे, माजी जि प सदस्य कै. तानाजी खताळ यांच्या पत्नी विमल खताळ,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पवार शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख अशोक भोसले यांच्या पत्नी सुनिता भोसले,बाळासाहेब डुबे पाटील,रामचंद्र पतंगे रामराव भोसले, वाघोली सूतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे,मोहोळ चे माजी सभापती यशवंत नरूटे, बब्रुवान (नाना ) वाघमारे(माळी ), भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजीव दादा खिलारे,सोमेश आबा क्षीरसागर,पेनुर चे ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी अशा अनेकांची नावे चर्चेत आली आहे.
जिल्हा परिषदेचा एकही गट यावेळी मागासवर्गीयांसाठी राखीव निघाला नाही यामुळे मागासवर्गीय समाजात नाराजीची लहर पसरली आहे.बाळराजे पाटील यांचा मतदार संघ उडल्यामुळे ते वगळता बाकीच्या जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा संधी मिळणार का ? पक्ष त्यांच्यावर विश्वास टाकणार का ?आणि पक्षाने विश्वास टाकला तरी जनता त्याला साथ देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .