सोलापूर – नुकताच झालेल्या ४४व्या कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा जानकी पुरस्कार वाडीकुरोली ( ता. पंढरपूर ) येथील वसंतराव काळे प्रशाचेची विद्यार्थिनी व कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबची खेळाडू स्नेहा अनिल लामकाने हिला प्राप्त झाला. त्यानिमित्त तिचा व तिचे प्रशिक्षक अतुल जाधव यांचा सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, सचिव उमाकांत गायकवाड, सहसचिव मोहन रजपूत, तांत्रिक समिती सचिव शिवशंकर राठोड, कार्यकारणी सदस्य सुरेश खुर्द-भोसले, शरद व्हनकडे, जावेद मुलाणी आदी उपस्थित होते.

















