सोलापूर – पेड्डेम इनडोअर स्टेडियम मापुसा गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या 10 व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विडी घरकूल सी ग्रुप मध्ये राहणारी कु. स्नेहा सिध्दाराम हिप्परगी यांना इंडिया गोवा इंटरनॅशनल मॅचेस मध्ये फाईट सिल्व्हर मेडल व काता टेक्निक ब्राऊन मेडल पटकावून यश संपादन केल्या बद्दल विजय इप्पाकायल मित्र परिवाराच्या वतीने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांना पेढे भरवून भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संजय वाघमारे, रमेश सुंचू, राजू पानघंटी, पांडुरंग बोल्लु , विजयकुमार कोंडा व सिध्दाराम हिप्परगी परिवार उपस्थित होते.

















