सोलापूर – महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी जो सावळा गोंधळ झाला. त्याबद्दल महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकडे पिटीशन दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याची एक प्रत महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे सर्वपक्षीय नेत्यांनी दिली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजून 18 मिनिटांनी खिडकीतून काही कागदपत्रे दिल्याचे लेखी पत्र चार नंबरचे मरोड या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली. या लेखी पत्रामध्ये हे कागदपत्र कशाचे आहेत ते आम्हाला आत्ताच सांगता येत नाही अशी माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या प्रभागाचे एबी फॉर्म मिळालेले नाहीत त्या प्रभागाची निवडणूक थांबवण्यात यावी अर्थात रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी युवक हा दिवस रात्र झटत असतो. जर अशा पद्धतीने या निवडणुका होत असतील तर निवडणुकाच कशासाठी घेतल्या जातात डायरेक्ट निवडून आल्याची घोषणा त्यांनी करावी. लोकशाहीची हत्या करण्याची ही बाब सुरू आहे. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळावेत. मुख्य सचिवांकडे नामवंत वकील असीम सरवदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पिटीशन दाखल करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, ज्ञानेश्वर सपाटे, अशोक निम्बर्गी, अरिफ शेख, माकप व राष्ट्रवादीचे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्तेचा दुरुपयोग भाजप करत आहे
जे फॉर्म भरलेले आहेत ते नंबर वाईज नाहीत. देण्यात आलेली लीगल नोटीसची प्रत ही सर्वपक्षीयांकडून आयुक्तांना देण्यात आलेली आहे. सत्तेचा दुरुपयोग हा भारतीय जनता पार्टी करत असल्याचे आरोप यावेळी करण्यात आला.
– चेतन नरोटे, शहर अध्यक्ष
कोणता आमदार पोहोच घेण्यासाठी पळत येतो
मैदानांमध्ये विजय मिळणार नसल्याच्या भीतीने अशा पद्धतीने पळवा पळवी चा खेळ हा आरोंना हाताशी धरून भारतीय जनता पार्टी केलेला आहे. पोच घेण्यासाठी कोणत्या पक्षाचा आमदार पळत पळत येतो. यातच याचे उत्तर दडलेलं आहे. दोन दिवसांची सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्या.
– अशोक निंबार्गी
























