सोलापूर – सो.जि. वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर येथे संघटनेचे राज्याचे मा. कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य कार्य. सदस्य अंबादास शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी शिवलिंग मेढेगार यांची तर कार्याध्यक्षपदी रविराज शेटे व सचिव पदी सचिन उर्फ बंटी बाबर यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेचे आतापर्यंतचे कामकाज व रूपरेषा याबद्दल गोरख भिलारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष आनंद तेंडुलकर, सहसचिव मल्लिकार्जुन कोरे व सदस्य पदी विजय भगरे, सुरेंद्र स्वामी, सुनील कोरे, प्रवीण गायकवाड, सनातन कुमार बंडी, दत्तात्रेय तात्या सपकाळ यांची व सल्लागारपदी महेश पटवर्धन, महावीर विद्यागज यांची ही निवड करण्यात आली. एकी हेच बळ आहे व यापुढे संघटनेच्या कामासाठी सर्वांनी सहकार्य करावे व आमचेही सहकार्य राहील असे नूतन अध्यक्ष शिवलिंगप्पा मेढेगार व कार्याध्यक्ष रविराज शेटे यांनी निवडीनंतर मत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते अशोक खरात, शशिकांत पाठक व इतर विक्रेते उपस्थित होते. निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार सचिव बंटी बाबर यांनी मानले.



















