बदनापूर / जालना – बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील समाजसेवक व परमानंद पब्लिक स्कूल, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर चे उपप्राचार्य रामेश्वर छगन पैठणकर यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यक्षेत्रातील आपार योगदान लक्षात घेऊन दि.११ नोव्हेंबर २०२५,रविवारी, भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे येथे “साऊ ज्योती फाउंडेशन व रमाबाई आंबेडकर संस्था, पुणे.” यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रामेश्वर पैठणकर हे फक्त शाळेतील कार्यपुरते मर्यादेत न राहता, शाळेबाहेरही श्री ताराशावली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, किन्होळा. च्या माध्यमातून समाजसेवा आणि निसर्ग संवर्धनासाठी तत्पर राहतात. मागील चार वर्षापासून त्यांनी वाचन चळवळ सुरू केली आहे, गावात “आपले सार्वजनिक वाचनालय, किन्होळा.” या नावाने गावातील मुलांनी अभ्यास करावा व वाचन प्रेम वाढेल म्हणून वाचनालय सुरू करुन विद्यार्थ्याचे ज्ञानवृद्धीसाठी कार्य केलेलं आहे.
तसेच दुर्गम भागातील त्यांच्या गावांमध्ये असलेले डोंगर माळांच्या जमिनीवर “वृक्ष लागवडीचे कार्य” हाती घेतली असून पर्यावरण संरक्षणासाठी सदैव कार्यकरत आहेत.
“विद्यार्थी प्रज्ञा जागृती” या परीक्षेच्या आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रज्ञाला प्रकाश ज्योत आणण्याचे काम मागील दहा-बारा वर्षांपासून ते करत आहेत.

मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षेचे ज्ञान,योगा प्रशिक्षण शिबीरे,महिला, शेतकरी, आदिवासींसाठी,तरुण, पर्यावरण व विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सदैव भरीव योगदान राहिले आहे. या सर्वांतून त्यांच्या कर्तुत्वाचा, देशभक्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श दिसून येतो.
शाळेत विविध उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य नैतिक मूल्य आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करण्याचे कार्य केलेले आहे.
पुणे येथे पार पडलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित अभिनेत्री, समाजसेवक आणि साहित्यिक यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रामेश्वर पैठणकर यांच्या पुरस्काराने केवळ किंन्होळा व बदनापुर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटत आहे. त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक समाज आणि तालुका प्रशासन यांच्याकडून त्यांचे सतत कौतुक होत आहे.
त्यांच्या कार्यामुळे समाजात सामाजिक समन्वय, पर्यावरणाप्रती जाणीव आणि सेवाभावण्याची नवीन प्रेरणा निर्माण झाली आहे, ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी ते एक आदर्श ठरले आहेत.



















