सोलापूर – ससेमी स्ट्रीटच्या एल्मो उर्फ छोटू ते रामायणातील ओठ हलविणारे कटपुतली असा प्रवास करणाऱ्या सोहमची राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी आहे. मागील आठवड्यात सोहमच्या विविध पपेट कार्याचा दखल भारत सरकार विदेश मंत्रालयाकडून घेतली आहे. आयसीसीआर की खोज या सदरात आतापर्यंत पाच विशेष कलाकारांचे माहिती प्रसार करण्यात आले आहे. सोहमचा परिचय या सदरात होणे सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
भारत सरकार विदेश मंत्रालय यांचे आयसीसीआर इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन या संस्थेच्या वेबसाईट, फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सोहमची माहिती देणारा व्हिडिओ प्राचारित करण्यात आला आहे. आयसीसीआर की खोज या सदराखाली त्याची व्हिडिओ माहिती प्रसार करण्यात आली आहे.
आयसीसीआयची स्थापना 1950 सालात करण्यात आली असून सरकारच्या विदेश मंत्रालयाद्वारे त्याचे संचलन होते. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट भारतीय संस्कृती आणि कलेचे जगभर प्रचार, प्रसार आंतरराष्ट्रीय स्तरवरती करण्याचे आहे. सोहमने आतापर्यंत 63 सार्वजनिक कार्यक्रम सादर केले आणि दोन कार्यशाळा घेतल्या. रत्नागिरीचे श्रीकांत ढालकार सरांकडून तो सध्या ओठ न हलविता गाणी गाण्याचे प्रशिक्षण घेत आहे.
भारत सरकारच्या विदेश मंत्रालय अंतरंगत चालणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या “आयसीसीआर कि खोज” या मालिकेत सोहमचा व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
वयाच्या चार वर्षापासून सुरू झालेला प्रवास साधारण दहा वर्षात राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. सॉफ्टवेअर कंपनी चालविणाऱ्या सोहमच्या वडिलांजवळ एक आयपॅड असायचा सोहमला लहान वयात आयपॅड मधून व्हिडिओ पाहण्याचा छंद लागला. विशेष म्हणजे रामदास पाध्ये यांचे झपाटलेला सिनेमातील बोलका बाहुला त्याला खूप आवडायचा त्यातील तात्या विंचूचा बाहुला हा एक बोलका बाहुला आपणास आठवत असेल या भावल्याची हुबेहूब नक्कल सोहम करायचा पण आवाज ओठ न हलविता काढायचा वडील शाम यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी ससेमी स्ट्रीट एल्मो बाहुल्याचा बोलका बाहुला बनविला.
काही दिवसांनी सोहम दैनंदिन बोलणेही ओठ न हलविता करीत होता. आई-वडिलांनी त्याचे या कलेतील रस पाहून इतर बाहुल्या बनवून दिल्या. सोहमचे सार्वजनिक ठिकाणी, शाळा, गणपती मंडळ येथे कार्यक्रमास सुरू झाले. सुरुवातीच्या काळात त्याने सोलापूरचे प्रसिद्ध जादूगर गुरुराज मिरजी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. वयाच्या आठ वर्षे त्याने भारतातील सर्वात कमी वयाचा बोलक्या बाहुल्या आणि कटपुतली कलाकार असा विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे नोंद केला.
कोव्हीडच्या काळात आई-वडिलांच्या मदतीने त्याने इंडिया फाइट्स अगेन्स्ट कोव्हीड हा लघु फिल्म बनविला. 44 देशातील 4000 स्पर्धकात सोहमला दुसरा क्रमांक मिळाला. या लघुकथेत भारताने कोव्हीड महामारीत एक अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्या असूनही यशस्वी मात केली. विविध कटपुतलीतून याचे सादरीकरण केले. यात एका लहान मुलाचे कोव्हीड काळातील जीवनमान दाखविले, मोदीजींचे बाहुलाचा वापर करण्यात आला. जानेवारी 2025 मध्ये सोहमने बंगळुरू येथील धातू आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवल मध्ये सहभाग नोंदविला. मावळा कटपुतली द्वारे त्याने नोककू विद्या पडवली प्राचीन भारतीय कला सादर केले.

















