बार्शी – सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी नाव उज्ज्वल करणारी बी. फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. तनुजा खिस्ते हिने ‘अविष्कार’ झोनल लेव्हल रिसर्च स्पर्धेत आपली प्रतिभा सिद्ध करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धा ही लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसी, वडाळा येथे आयोजित करण्यात आली होती. तसेच तिच्यासोबत तृतीय वर्ष बी फार्मसीतील विद्यार्थिनी श्रुती पवार हिने विशेष काम पाहिले. त्यांचा या यशाने महाविद्यालयात अभिमानाचा क्षण निर्माण केला. महाविद्यालयातील इतर विद्यार्थिनींनी जसे स्नेहल टोगे, वैष्णवी सपकाळ, संपदा मुंडे, राजनंदिनी गाढवे, जोहा पटेल, आमना शेख, अर्पिता परखे, स्नेहा नांदेडकर, रसिका राठोड, स्नेहल देशमुख, प्रणिता अंगुले यांनी झोनल लेवल स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
‘अविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन’ ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधन कौशल्याला व्यासपीठ देणारी अतिशय प्रतिष्ठित स्पर्धा आहे. कल्पकता, नवोन्मेष व वैज्ञानिक दृष्टीकोनाची चाचणी घेणाऱ्या या स्पर्धेत तनुजाने सादर केलेला प्रकल्प परीक्षकांचे लक्ष वेधून घेत अग्रस्थान मिळवण्यात यशस्वी झाला.
तनुजा खिस्ते हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, तिच्या उज्वल शैक्षणिक आणि संशोधनात्मक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रवासात मार्गदर्शनाची साथ देणारे अविष्कार को-ऑर्डिनेटर प्रा. शेख अकलाख आणि प्रेरणादायी नेतृत्व करणारे प्राचार्य डॉ. सुजित करपे सर यांचे योगदान विशेष महत्वाचे ठरले.
संस्थापक श्री अरुणदादा बारबोले व सचिवा सौ. कल्पनाताई बारबोले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या नाविन्यपूर्ण कामगिरीचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


















