तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील कुमठे येथे जाऊन कै. संभाजी दत्तात्रय सिनगारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
14 जुलै रोजी कै. संभाजी दत्तात्रय सिनगारे यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व दुःख व्यक्त केले. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या कठीण प्रसंगी धीराने सामना करण्याचा सल्ला दिला. (Ajit Pawar)
या भेटीदरम्यान स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.