सोलापूर, 1 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता नियोजन भवन सभागृह, शासकीय दुध डेअरी शेजारी, सात रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीस जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे