तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत सरकारकडून मोठा निधी सोलापूर महापालिकेला मिळतो, तरीदेखील शहरात कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. तेव्हा सोलापूर शहर कचरामुक्त कधी होणार? असा परखड सवाल आ. विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) केला. याचवेळी त्यांनी शहरात असलेले कचरा डम्पिंग स्टेशन शहराबाहेर हलविण्याचीही मागणी केली.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) सोलापुरातील कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधताना म्हटले की, मागील 10 वर्षांपासून सोलापूर शहरात कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेने खासगी मक्तेदारांची नेमणूक केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठा निधी केंद्र सरकारकडून महापालिका प्रशासनाला मिळतो. तरीही शहरातील कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे. हे लक्षात घेता सोलापूर शहर कचरामुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन काही उपायोजना करणार आहे का? असा सवाल आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला.
त्यांनी शहरातील कचरा डम्पिंग स्टेशनबाबतदेखील प्रश्न उपस्थित केला. पूर्वी कचरा डम्पिंग स्टेशन हे शहराबाहेर असायचे, पण शहर वाढल्याने आता हे स्टेशन शहरात आहेत. त्यामुळे रोगराईची समस्या उद्भवली असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अनारोग्याच्या समस्येने नागरिक संतप्त झाले आहेत. हे विचारात घेता हे डम्पिंग स्टेशन शहराबाहेर हलवणार का? असा सवालदेखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला.
मंत्र्यांनी दिले असे स्पष्टीकरण :
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, सोलापूर शहरातून दररोज 300 टन कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यावर बायो-एनर्जी प्लांटमध्ये प्रक्रिया केली जाते. शहरात घंटागाड्या फिरवून कचरा संकलित केला जातो. मात्र झोपडपट्टी, दाट नागरीवस्ती भागात घंटागाडी फिरवूनदेखील कचऱ्याची समस्या कायम आहे. Maharashtra Assembly
डंपिंग स्टेशनठिकाणी सुमारे सात लाख टन कचरा साचला होता. त्यापैकी पाच लाख टन कचरा हटविण्यात आला असून उर्वरित कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी दुर्गंधी पसरू नये म्हणून स्प्रे मारण्यात येत आहे. कचरा डम्पिंग स्टेशन हटविण्याच्या मागणीसंदर्भात पाहणी करून निर्णय घेण्यात येईल.Maharashtra Assembly