मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील शनिवारी मुंबईच्या दिशेने पायी निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकारला इशारा दिला आहे.
26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल, असे म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जरांगे पाटील पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हणाले : संविधान हातात घेऊ नयेत, यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे.
सरकारला आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहेत. दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत.
मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात, दादागिरीची भाषा करू नयेत. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा,” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.