सोलापूर – इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर येथे घरगुती कारणावरून दिवसाढवळ्या दि.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजे सुमारास शेतात जाऊन सासऱ्याचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात गंभीर झाल्याची घटना घडल्या. आरोपीच्या विरोधात आलम उर्फ लाला जहांगीर शेख यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले आहे.
संपूर्ण हकीकत अशी की, आरोपी सादिक सैफन दफेदार रा. पान मंगरूळ चे रहिवासी असून शेती व तात्पुरता उर्दू शिक्षक म्हणून काम करत होते. लग्न होऊन सहा वर्ष ओलांडले परंतु या मागील दोन वर्षापासून घरातील तक्रार व भांडण सुरू होते. तक्रार आणि भांडण घटस्फोटपर्यंत आले असल्याची माहिती गावकरीत चर्चा आहे. आरोपी सादिक यांनी घटस्फोट या विषयाची खुन्नस धरून पान मंगळूर पासून इंगळगी मयत व्यक्ती सिकंदर मुलाका शेख या सासऱ्यांचा शेतात जाऊन चाकूने छातीत घोपसून हत्या केली आहे. त्याचप्रमाणे स्वतःवर सुद्धा चाकूचे स्वतः वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीचे सासरा जागीच ठार झाले असून आरोपी मात्र गंभीर जखमीत सोलापूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ही घटना वळसंग पोलीस ठाण्याला माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे व पोलीस उपनिरीक्षक रवीराज कांबळे व स्टाफ घटनास्थळी हजर झाले. अक्कलकोट विभागीय अधिकारी विलास यामावार व वळसंग प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवीराज कांबळे यांनी पुढील तपास करीत आहे.

























