सोलापूर – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीचे औचीत्य साधून सुशिल रसिक सभागृह, मुरारजी पेठ, सोलापूर येथे सकाळी ६.०० वाजता हा दानपट्टा फिरविण्याचा विक्रम चालू होऊन सायंकाळी ठिक ६ वाजून १५ मिनिटांनी समारोप करण्यात आला. सलग १२ तास १२ मिनिटे व १२ सेकंद दानपट्टा फिरवून विश्वविक्रम नोंद केला.
संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित, संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकुल, सोलापूर येथील कु. सोनाक्षी मोहन माडे, वय वर्ष १५, इयता ९ वी मध्ये शिक्षण घेणा-या या विद्यार्थीनीने पारंपारीक खेळ प्रकाराचे प्रशिक्षण देणा-या सोलापूरातील प्रसिध्द रूद्रशक्ती गुरूकुल या प्रशिक्षण केंद्रात गेली ५ वर्षापासून तिचे विविध पारंपारिक खेळांचे प्रशिक्षण घेत आहे. येथील प्रशिक्षक श्री विवेक मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे कार्य पूर्ण केले.
याप्रसंगी ऑरेंज बुक व ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकृत पदाधिकारी उपस्थित राहुन दोन्हीही वर्ल्ड कपचे प्रमाणपत्र जाहिर करून त्यांच्या हस्ते बहाल करण्यात आले.
या समारोप प्रसंगी संभाजीराव शिंदे विद्यामंदिरच्या संस्था संचालिका डॉ. सौ. राधिकाताई चिलका, जिल्हा सरकारी वकील अॅड.श्री प्रदिपसिंह रजपूत, नगरसेवक श्री भारत बडूरवाले, मुख्याध्यापक श्री सतीश मल्लाव, मुख्याध्यापक श्री सचिन ढोपरे, रूद्रशक्ती गुरूकुलचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संस्थेचे मोठे सहकार्य लाभाले. या विक्रमास संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुर्यप्रकाश (दादा) कोठे, आमदार श्री देवंद्र (दादा) कोठे, नगरसेवक श्री प्रथमेश (दादा) कोठे, संस्था संचालिका डॉ. सौ. राधिकाताई चिलका, मार्गदर्शिका श्रीमती तनुजा मारपल्ली, सर्व शिक्षक, पालक यांनी कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

























